महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्हा परिषद रस्त्यावरील लोखंडी ड्रेनेज चेंबर दुरावस्थेत

    सातारा कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषद चौकातील लोखंडी ड्रेनेज चेंबर गेल्या अनेक महिन्यापासून अत्यंत धोकादायक स्थितीत खचलेले आहे. सातारा नगर परिषद या बाबतीत दुर्घटना घडल्यानंतरच  सदर काम हाती घेईल असे दिसते. जिल्हा परिषद चौक हा सातारा शहरातील अत्यंत गजबलेला परिसर समजला जातो. या परिसरात बँक खाजगी हॉस्पिटल, जिल्हा परिषद, सर्किट हाऊस त्याचबरोबर अनेक शैक्षणिक संस्था असून हा रोड कायमच रहदारीने व्यस्त असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून  भर चौकामध्ये चार बाय चार फुट व्यासाचा लोखंडी चेंबर खचलेला असून सातारा नगरपरिषद याबाबतीत  ढिम्म  आहे.
       सदर चेंबर समोर बॅरिगेड उभे करून सदर काम टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर ॲम्बुलन्सची ये जा असते. सदर बॅरीगेटमुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी सातारा नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करून होणारा संभव्य धोका टाळावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!