महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा उद्या साताऱ्यात पार पडणार

सातारा: महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार, 16 मार्च रोजी दुपारी 2 वाजता, सातारा राजवाडा पाठक हॉल येथे पार पडणार आहे. या पुरस्कारासाठी वैद्यकीय, पत्रकारिता, समाजसेवा, पोलिस सेवा, शिक्षण, कला-संस्कृती आणि उद्योजकता या क्षेत्रांतील व्यक्तींना निवडण्यात आले आहे.

    पुरस्कार वितरण सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.या सोहळ्यात कृतिशील समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, पोलीस अधिकारी, कलाकार आणि उद्योजकांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित केले जाणार आहे.

    या व्यतिरिक्त इतर अनेक मान्यवरांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यामुळे विविध क्षेत्रांत समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळणार आहे.

    समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या लोकांचे योगदान ओळखून त्यांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!