संगम माहुलीतील काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात प्री-वेडिंग आणि फोटोशूटवर बंदी
सातारा जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार तसेच अनेक मंदीरे दोन्ही काठावर बाळगणारा संगम माहुली येथील कृष्णा नदीचा घाट व प्राचीन काशी विश्वेवर मंदीरअनेक जणांना आपल्या प्रेमात पाडतो.त्याचे कारण ही तसेच आहे. खळखळ वाहणारी कृष्णा – वेण्णा नदि चा संगम कडेला निसर्गरम्य परीसर, भरपूर मोठे वाळवंट त्यामुळे चित्रपटसृष्टी व फोटोप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरते.
या मुळे सर्व भाषांतील चित्रपटांचे चित्रीकरण बहुतांशी बॉलीवूडचे प्रमाण यामध्ये जास्त आहे.मात्र,अलीकडे मंदिराच्या पावित्र्याचा विसर पडून काही उत्साही फोटोग्राफी टीम मंदिराच्या आत आणि आवारात अनुचित पोझमध्ये फोटोशूट करत असल्याचे प्रकार समोर आले. भक्तांना त्रास देणे, मंदिरातील शांततेचा भंग करणे असे प्रकार वाढल्याने विश्वेश्वर देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी कडक निर्णय घेतला आहे.
मंदिर परिसरात प्री-वेडिंग, मॉडेलिंग आणि बेबी फोटोशूट पूर्णतः बंद करण्यात आले असून, जर कोणी असे चित्रीकरण करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच, मंदिर परिसरात स्पष्ट सूचना असलेले फलक लावण्यात आले आहेत.
या निर्णयाचे भक्तगण आणि समाजातील सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
