वर्तमानात सावित्रीमाईंचे विचार कृतीतून रुजविणे हीच आदरांजली
खंडाळा विभाग शिक्षण समितीच्या वतीने आज ०३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजेंद्र शैक्षणिक संकुल आवारात अभिवादन करण्यात आले. यावेळी खंडाळा विभाग शिक्षण समिती सचिव अनिरुद्ध(संजीव) गाढवे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना अनिरुद्ध गाढवे म्हणाले,”भारतीय संस्कृतीत स्त्री शक्तीस अनन्य साधारण महत्व असून, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीशी तडजोड न करता त्यावर मात करत स्त्री शैक्षणिक क्रांतीचे कार्य सुरू ठेवले. यातूनच स्त्री सक्षम आणि बलशाली बनली.वर्तमानात स्त्री सक्षम आहे याचे सर्वस्वी श्रेय फुले दाम्पत्यांच्या त्यागाला जाते. यासाठी सावित्रीमाईंचे विचार कृतीतून रुजविल्यास हीच त्यांना आदरांजली आहे.”
या समारंभासाठी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व युवा नेते राहुल घाडगे, ग्रामपंचायत बावडा चे सदस्य अतुल(बाबा)पवार, खंडाळा नगरपंचायत विद्यमान नगराध्यक्ष उज्वला संकपाळ, युवानेते प्रविण संकपाळ,राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्या अरुंधती गाढवे, उपमुख्याध्यापिका सुशिला मोहिते, एकता ग्रंथालय संचालक योगिता गाढवे, वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालय शिक्षक, प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
