महत्त्वाच्या बातम्या

आनेवाडी टोल नाक्यावर असुविधा,स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाका कायमच वसुली, कर्मचाऱ्यांची अरेरावी, दादागिरी आदी कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. टोलनाक्यावर वाहन चालकांकडून टोलवसुली केली जाते. मात्र, या टोलनाक्यावर प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. शौचालय नाहीत, येथे क्रेन नाही, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडेही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजूला शौचालय पाहिजेत मात्र ते देखील गेली अनेक वर्षे नसल्याने मुख्यकरून महामार्गवरून प्रवास करणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय येथे होत आहे.  त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
         पुणे- सातारा रस्त्यावर आनेवाडी टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र टोलनाके आहेत. साताऱ्याकडे जाताना स्वच्छतागृह नाही. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रवाशांना या ठिकाणी अनेकदा वाहने थांबवून नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागते. विशेषतः महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. टोलनाक्यावर सण आणि सुटीच्या दिवशी बरेचदा ट्रॅफिक लागल्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते.परिसरात स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांना उघड्यावर जावे लागते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र, आनेवाडी टोलनाक्यावर भरमसाठ टोल भरूनही प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरील आनेवाडी टोलनाक्यावरील स्वच्छतागृहाची दुरावस्था देखील झाली असून येथील असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची देखील अडचण होत असते.

दुभाजकात व्यवसाय थाटणाऱ्या व्यवसायिकास टोल अधिकाऱ्यांचा आधार…?
    त्यातच आनेवाडी दिशेला येताना सेवा मार्ग व दुभाजक यामध्येच एका फळ व्यवसायिकाने हातगाडा टाकून आपला व्यवसाय थाटला आहे. अगोदरच गावात येताना वाहणांची कोंडी होत असताना यामुळे आणखी अडचणी निर्माण होत आहेत. वाहने उभी राहिल्याने अपघात देखील होत आहेत. कायद्याच्या चौकटीत चालणाऱ्या टोल अधिकाऱ्यांनी या हातगाडा व्यवसायिकास आधार दिला  असल्याचे बोलले जात आहे. गेली अनेक वर्षे बिनधास्तपणे हा व्यवसाय  धोकादायक ठिकाणी चालू आहे.

          आनेवाडी गावात येताना उघड्यावर पुरुष नैसर्गिक विधिसाठी उभे असतात महिलाना आता येताना अवघडल्यासारखे होते मात्र याबद्दल कोणीच दखल घेत नाही ही फार मोठी गभीर बाब आहे. याबद्दल आम्ही ठोस पावले उचलू असा इशारा मर्ढे गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच सविता शिंगटे यांनी दिला  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!