मुंबईतील पावनगड निवासस्थानी स्व. लोकनेते साहेबांचा जयंती सोहळा आयोजित
वारसा जनसेवेचा, वसा सर्वांगीण विकासाचा!
लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई साहेबांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मा. ना. शंभूराज देसाई साहेबांकडून विनम्र अभिवादन
मुंबई : वंदनीय लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई साहेबांची आज ११५ वी जयंती. त्यानिमित्त आज त्यांच्या जयंतीचा सोहळा पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबईतील पावनगड निवासस्थानी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आदरणीय स्व. लोकनेते साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मा.ना.शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्या स्मृतींना वंदन केले.
यावेळी मा.ना.शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांशी संवाद साधला. वंदनीय लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई साहेबांच्या विविध आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला.स्व.लोकनेते साहेबांनी घालून दिलेला उत्तुंग कार्याचा आदर्श आम्हास सदैव प्रेरणादायी आहे.त्या प्रेरणेतूनच पाटण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच स्व.लोकनेते साहेबांनी दिलेला जनसेवेचा वारसा आम्ही पुढे नेऊ, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला.
