महत्त्वाच्या बातम्या

कुर्ला येथील इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम ऐकतेचा संदेश

मुंबई : कुर्ला  वॉर्ड 168 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष युवा कार्यसाम्राट नेते श्री अजय समगिर  यांनी मोठ्या धूमधामात दावत-ए-इफ्तार पार्टी आयोजित केली. या विशेष समारंभात प्रमुख मान्यवर मा. आमदार मिलिंद आण्णा कांबळे , उत्तर मध्य जिल्हा निरीक्षक श्री चंद्रमनी जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
       या पार्टीला मुस्लिम समुदायाच्या मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली ज्यामुळे समाजातील एकता आणि सौहार्दाचे प्रतीक म्हणून ही संधी साजरी झाली. उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमाचे महत्त्व आणि त्याच्या माध्यमातून समाजातील एकात्मता वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली. पार्टीमध्ये विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली, तसेच मुस्लिम समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्साहाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!