महत्त्वाच्या बातम्या

शेटफळ रोड, माढा येथे जाहिर शिवमेळावा संपन्न

      सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ रोड, माढा येथे महायुतीचा शिवमेळावा संपन्न झाला .या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती पर्यटन, खनिकर्म व माझी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.शंभूराज देसाई आणि उद्योग मंत्री मा.ना उदयजी सावंत होते.यावेळी मा.ना. शंभूराज देसाई  यांनी सोलापूरकर जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला दिलेल्या भरभरून पाठिंब्यामुळे आपले ऋण व्यक्त केले.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अखंडपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने समाजातील प्रत्येक घटकासाठी विधायक कामगिरी केली आहे. शिवसैनिक म्हणून ही कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आपले कर्तव्य आहे. तसेच सोलापूरमध्ये शिवसेना पक्षाची सभासद नोंदणी सर्वाधिक व्हावी यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले.या सभेला प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!