माणमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
रांजणी (ता. माण ) येथे विद्युतवाहिनीच्या आर्थिंगला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार दि. ६ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेतात शेळ्या चारत असताना ही घटना घडली. सुमन शिवाजी चव्हाण वय ४८ असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दि 6 जून 2025 रोजी दुपारी 3.40 वा. चे सुमारास रांजणी ता. माण जि. सातारा येथील शिरतोडे मळा येथे सुमन शिवाजी चव्हाण वय 48 वर्षे रा. रांजणी ता. माण जि. सातारा यांना शेतात शेळ्या चारत असताना एम.ए.सी.बी. च्या आर्थिंगच्या तुटलेल्या तारेचा इलेक्ट्रिक शाँक लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुमन चव्हाण स्वतःच्या शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेल्यानंतर पडलेल्या विजेच्या तारांना अडखडून शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी तक्रार सुर्यकांत दादा चव्हाण रा. रांजणी यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
या घटनेची माहिती मिळतात म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस एम एन हांगे , महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून म्हसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एम. एन. हांगे , महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे करत आहेत.
