महत्त्वाच्या बातम्या

आंधळीतील होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद 

   उत्साही महिलांच्या मोठ्या गर्दीत व अतिशय जल्लोषी वातावरणात माण तालुक्यातील आंधळी येथे पैठणीचा खेळ रंगला. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्ताने बक्षीसांची लयलूट करण्यात आली. रक्षाबंधनाचे औचित्य साधून सरपंच दादासाहेब काळे व सहकाऱ्यांनी महिलांसाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता सुरु झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाऊन रात्री उशिरा संपला. मजा, मस्ती, गाणी यांच्या साथीने विविध खेळांच्या माध्यमातून निवेदक चंद्रकांत कोकाटे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच महिलांच्या आवडीचे झोके बांधण्यात आले होते. या झोक्यांवर खेळण्याचा मनमुराद आनंद महिलांनी घेतला.

 

      सुप्रिया गोरे, माया काळे, प्रियंका देवकर या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या विजेत्या अर्थात पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर शैला काळे, अमृता शेंडे, ऋतुजा सकट या उपविजेत्या ठरल्या. वीस महिलांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तर सहभागी प्रत्येक महिलेस डस्टबीन देण्यात आले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे व मीनाक्षी काळे, आयोजक लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, संतोष काळे, विरळीच्या सरपंच निलिमा घुटूकडे, उपसरपंच शिवाजी काळे, अभिजीत भोसले, सुधाकर काळे, सविता खरात, अश्विनी माने, सुरेश पवार, जयश्री चव्हाण, जयकुमार काळे, तानाजी काळे, संजय कुलकर्णी, सोपान चव्हाण, उज्वला जगताप, आप्पा गोरे,संतोष काळे तसेच गावातील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी अजित गोरे यांच्याकडून  दोन पैठणी देण्यात आल्या होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!