महत्त्वाच्या बातम्या

कटेंगे तो बटेंगे च्या नाऱ्याला महाराष्ट्रातील जनता भीक घालणार नाही…शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार

    भाजपला देशात आणि महाराष्ट्रात जाती-पातीत, धर्मामध्ये तेढ निर्माण करून भाजपला काय साध्य करायचे आहे ? भाजपच्या या हिंदुत्व ढोंगी व निवडणुकीवर डोळा ठेवून केलेल्या घोषणा आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी बटेंगे तो कटेंगे..चुनाव होने के बाद देश को और महाराष्ट्र को लुटेंगे हा भाजपचा कुटील डाव आहे. हे देशातील व महाराष्ट्रातील जनतेने आता ओळखले आहे. मोदी म्हणतात एक रहोगे तो नेक रहोगे.. हिंदुस्तान 75 वर्षापासून एक आहे आणि नेक आहे आणि राहील ही निवडणुकीच्या तोंडावर मोदींना चिंता करण्याची गरजच काय पडली..?
       देवेंद्र फडणवीस म्हणतात वोट जिहाद पासून सावध रहा.. पण निवडणुकीमध्ये मदरशा दर्ग्यामध्ये मतासाठी का लोटांगण घालता..? याच्यावर देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत?
निवडणूक आली की हिंदू मुस्लिम धर्मवाद-प्रांतवाद  भाजपला आठवतो. निवडणूक झाली की महाराष्ट्र व देश लुटायला भाजप मोकळीच आहे. सोबतीला आहेत अदानी आणि अंबानी या दोन चाकावर भाजपचा गाडा चालतोय. महाराष्ट्रातील उद्योग धंदे मोदी-शहा च्या कृपेने गुजरात-युपी-बिहारला पाठवतात. त्या बद्दल फडणवीस का बोलत नाहीत. देशातील हिंदू-मुस्लिम सर्व बहुजन समाज आता जागा आहे. त्यामुळे भाजपच्या या फसव्या घोषणेला आता देश फसणार नाही. देश जागृत झाला म्हणूनच लोकसभेला अयोध्येमध्ये 5 ही जागेवर भाजपला सफाटुन मार खावा लागला. कटेंगें तो बटेंगे हा आमचा नारा नाही..बचेंगे तो और भी लढेंगे हा छत्रपतींच्या मावळ्यांचा नारा आहे. हे बहुजनांनी विसरून चालणार नाही.

      महाराष्ट्रातील जनता गुण्यागोविंदाने एकोप्याने राहतात. हे महाराष्ट्रातील एकजूट अखंडता अशीच राहावी. आणि भाजपच्या या फसव्या घोषणेला  मुठ माती द्यायची वेळ आली आहे. म्हणून बहुजनांनी एकत्र राहून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, राहुलजी गांधी, शरद पवार साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सोबत राहून महाविकास आघाडीला सत्तेत बसवु या असे आवाहन शिवसेना नेते तथा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!