महत्त्वाच्या बातम्या

मा. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचार सभेसाठी आढावा बैठक संपन्न

     सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. विविध ठिकाणी उमेदवारांच्या  प्रचार सभा घेतल्या जात आहेत.  सातारा येथे आ. शिवेंद्रराजे भोसले यांची  उदया गांधी मैदान येथे भव्य प्रचार सभा आयोजित केली आहे. त्यासाठी आज त्यांच्या सुरुची निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
     या बैठकीस आ. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले या दोन्ही गटातील कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक तसेच लिंब, कोंडवे व सातारा जिल्हा परिषद  गणातील सर्व आजी माजी सदस्य, अजिंक्य समुहाचे पदाधिकारी, भाजपाचे  सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सुनिल काटकर, ॲड.दत्ता बनकर, अविनाश कदम, राजूभैय्या, भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेणू येळगावकर, सौ. ॲड. अरुणा बंडगर, मा नगराध्यक्षा रंजना रावत, सौ.सुजाता राजेमहाडिक उपस्थित होत्या.
       या बैठकीमध्ये मा.आ शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, उद्या होणाऱ्या प्रचार सभेवेळी प्रत्येकाने शिस्त पाळून ही सभा व्रिकमी गर्दीने पार पाडायची आहे. त्याचबरोबर सामान्य नागरीकांना वाहनांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!