मा.ना.शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर-मरळी येथे जनता दरबार संपन्न
दौलतनगर-मरळी येथील कार्यालयात पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. दि. 11 डिसेंबर रोजी हा मेळावा पार पडला. मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.तसेच त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. याप्रसंगी त्यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारून त्याबाबत सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले . यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
