महत्त्वाच्या बातम्या

मुंबई मधील भिवंडीत गोदामास भीषण आग

  महाराष्ट्रातील भिवंडी तालुक्यातील एका लॉजिस्टिक गोदामाला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या गोडाऊन मध्ये कापड वस्तू, रसायने तेल, आणि प्लास्टिक वस्तूंचा साठा होता.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले की या आगीला लेव्हल 2 फायर असे लेबल लावले. अग्निशमन कार्य सध्या सुरु आहे.

     गोडाऊन मध्ये शॉर्टसर्किट मुळे आग लागली असावी. कापड आणि रसायने यांसारख्या विविध ज्वलनशील वस्तूंमुळे अगीची तीव्रता वाढली असे अधिकाऱ्यांनी सांगितले . सध्या अग्निशमन दलाच्या सहा गाड्या कामाला लागल्या असून आग आटोक्यात आली आहे. गोडाऊन मध्ये लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट आभाळात पसरले. ही घटना मुंबई- नाशिक हायवे जवळ घडली. पूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या आधी सुद्धा ठाण्यातील वागळे औद्योगिक इस्टेट मधील एका कारखान्यात 2 ऑक्टोबर रोजी भीषण आग लागली होती. कारखान्यास सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!