ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य सन्मान सोहळा रविवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्री शांतिगिरीजी महाराज इंग्लिश मेडीयम स्कूल मलवडी (ता. माण) येथे आयोजित करण्यात आला आहे.
महामंत्री, श्री पंचदशनाम जुना आखाडा वाराणसी तथा संस्थापक अध्यक्ष-जनसेवा प्रतिष्ठान मलवडी महाराष्ट्र, बुधगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान वडियावीर गुजरातचे प्रमुख श्री महंत शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री शांतिगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान, मलवडी यांनी केले आहे. तरी मलवडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.