पुणे

पीएमपीएमएल बसच्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:


हडपसर ते लोणीकाळभोर प्रवासादरम्यान चोरी; २१ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
हडपसर : पीएमपीएमएल बसमधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत ३६ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. संबंधित महिला १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथून लोणीकाळभोरकडे पीएमपीएमएल बसने प्रवास करत होती. यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

या प्रकरणी राहुल नामदेव देडे (वय २१, रा. खजुरे वस्ती, दगडूजवळ, वैदुवाडी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बी. आर. खटके करीत आहेत.

error: Content is protected !!