महत्त्वाच्या बातम्या

NTPC Green Energy बाबत  नवीन माहिती…गुंतवणूकदारांना होणार फायदा

सध्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी IPO बाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना ही कंपनी स्वतःचा विस्तार करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची जमवणूक करणार आहे. यादरम्यान आयपीओ संदर्भात नवी माहिती समोर आले आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैशाचे नियोजन कशाप्रकारे करावे यासाठी मदत होणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही कंपनी ipo च्या माध्यमातून 10,000 हजार कोटी रुपये उभे करणार आहे. ब्लूमबर्गने  दिलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ बाबतच्या रिपोर्ट मध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी ipo ची इशू प्राईज 100 रुपये (1.18)डॉलर प्रति शेअर असण्याची शक्यता आहे. या कंपनीने आयपीओ साठी किंमत पट्टा म्हणजे (प्राइस बँड) अद्याप निश्चित केलेला नसून कंपनी याबाबत चर्चा करत आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी पॉवर जनरेशन करणाऱ्या एनटीपीसी या कंपनीची उप कंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ पूर्णपणे फ्रेश इशू असेल म्हणजे ती कंपनी ipo च्या माध्यमातून सर्व  फ्रेश शेअर्स जारी करेल. गुंतवणूकदार ipo च्या माध्यमातून आपली हिस्सेदारी विकणार नाहीत.

     एनटीपीसी ग्रीन  आयपीओचे काही शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आयपीओ तुन मिळालेल्या दहा हजार कोटी मधून 7500 कोटी रुपये कर्ज फेडीसाठी वापरणार आहेत व राहिलेली रक्कम ही कार्यालयीन कामासाठी व कंपनीच्या विस्तारासाठी वापरली जाईल. ही कंपनी आयपीओ नंतर मुंबई शेअर बाजार आणि  राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!