पुणे

हुंड्यासाठी विवाहितेचा ७ वर्षे छळ; मानसिक आणि शारीरिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सासरच्या मंडळींवर आरोप!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे: हुंड्यासाठी पैशांची आणि सोन्याची मागणी करत विवाहितेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील मुकुंदनगर परिसरात उघडकीस आला आहे. विवाहितेला वारंवार टोमणे मारणे, त्रास देणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप पतीसह सासू-सासरे आणि नणंदे विरोधात करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ३५ वर्षीय बहिणीचा अक्षय झांबरे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर ती मुकुंदनगर येथील मंगलमय, झांबरे पॅलेसजवळ सासरी राहत होती. १३ मार्च २०१९ पासून १ नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत पती अक्षय झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांनी संगनमत करून तिच्याकडे सातत्याने पैशांची आणि सोन्याची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मागण्या पूर्ण न झाल्याने विवाहितेला वारंवार टोमणे मारून तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तसेच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
       या प्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५००/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ३(५), ३५१, ३५२ तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ मधील कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पवार करीत आहेत.

error: Content is protected !!